Dighi : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेला ट्रक चोरट्यांनी पळवला

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला लाॅक करून पार्क केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 19) पहाटे पावणे एक ते सहा वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवर डुडुळगाव येथे घडला.

सतीश सूर्यभान घुले (वय 31, रा. डुडुळगाव) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश यांनी त्यांचा दोन लाख रुपये किमतीचा टाटा एल पी ट्रक (एम एच 14 / ए एच 6544) रविवारी पहाटे पावणे एक वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवर डुडुळगाव येथे रस्त्याच्या बाजूला लाॅक करून पार्क केला.

अज्ञात चोरट्यांनी रात्री ट्रक चोरून नेला. पहाटे सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दीघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.