Dighi: वीस लाखांची मागणी करत गोळ्या घालण्याची धमकी

आरोपी परांडे याने काही दिवसांपूर्वी फिर्यादी वाळके यांच्याकडे उसने पैसे मागितले होते. त्यावेळी त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.

एमपीसी न्यूज – वीस लाख रुपयांची मागणी करत पोटाला पिस्तूल लावून गोळ्या घालण्याची धमकी दिली. ही घटना 31 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दत्तगड डोंगराच्या पायथ्याला दिघी येथे घडली.

उमेश विठ्ठल वाळके (वय 45, रा. दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बापू परांडे (रा. दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परांडे याने काही दिवसांपूर्वी फिर्यादी वाळके यांच्याकडे उसने पैसे मागितले होते. त्यावेळी त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.

याचा राग मनात धरून परांडे याने 31 जुलै रोजी वाळके यांना मारहाण करीत पोटाला पिस्तूल लावले. ‘दोन दिवसात वीस लाख दे, नाहीतर तुला गोळ्या घालणार, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.