Dighi : वाकड, दिघी परिसरातून तीन लाखांची वाहने पळविली; संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज – दिघी परिसरातून एक डंपर आणि वाकड परिसरातून एक मोटारसायकल अशी एकूण तीन लाखांची दोन वाहने चोरीला गेली आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुभाष हरिश्चंद्र शिंदे (वय 31, रा. देहू फाटा, तापकीरनगर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांच्या मालकीचा एम एच 34 / एम 4813 हा दोन लाख रुपये किमतीचा हायवा डंपर आहे. त्यांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचा डंपर साई इंटरप्राईजेसच्या गोडाउनमध्ये पार्क केला. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा डंपर चोरून नेला. हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

अभिषेक गणपत सागरे (वय 19, रा. काळेवाडी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक यांची एक लाख एक हजार 937 रुपये किमतीची एम एच 14 / एच वाय 4789 ही दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 19 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.