_MPC_DIR_MPU_III

Dighi : घरफोडी करून तीन तोळ्याचे दागिन्याची चोरी

एमपीसी न्यूज – फ्लॅटचे कुलूप तोडून तीन तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना दिघी येथे गुरुवारी (दि. 4) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

शुभम एकनाथ साकोरे (वय 25, रा. दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चार ते पावणेपाच या कालावधीत शुभम यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. फ्लॅटमधून तीन तोळे वजनाचे 66 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.