Dighi : तीन चोरट्यांनी दुचाकी पळविली

एमपीसी न्यूज – अपघाताचा बहाणा करीत तीन चोरट्यांनी दुचाकी आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री दिघी येथे घडली.

शुभम सुरेशराव देशमुख (वय 22, रा. गजानन महाराज नगर, तालेरा गोदामाच्या मागे, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास शुभम हे आपल्या दुचाकीवरून जात होते. ते दिघी जकात नाका येथे आले असता तीन चोरटे दुचाकीवरून आले. चोरट्यांना धक्‍का लागला नसतानाही अंगावर गाडी घालतो का, असे म्हणत शुभम यांच्या अंगावर धावून आले. ‘चल चौकीला’, असा दम देत शुभम यांची दुचाकी, मोबाईल आणि हेडफोन असा 58 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोलापुरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.