Dighi : ओव्हरटेक करताना ट्रकची टेम्पोला धडक; दोघे जखमी

एमपीसी न्यूज – ओव्हरटेक करत असताना ट्रक तीनचाकी टेम्पोला घासला. यामुळे टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील दोघेजण जखमी झाले. तसेच टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 8) दुपारी आळंदी-देहू रोडवर जुन्या आळंदी पुलाजवळ घडली.

बाळासाहेब भाऊसाहेब जाधव (वय 40, रा. संजय गांधी नगर, मोशी), हेमंत डुंबरे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

बाळासाहेब यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर रमेश गुंड (वय 22, रा. बडदापूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी भाऊसाहेब आणि हेमंत डुंबरे हे दोघे तीनचाकी टेम्पोमधून (एम एच 14 / एम एच 4496) आळंदी-देहू रस्त्याने जात होते.

जुन्या आळंदी पुलाजवळ आरोपी ट्रक चालकाने त्याचा ट्रक हयगयीने चालवून भाऊसाहेब यांच्या टेम्पोला ओव्हरटेक केले. त्यावेळी ट्रक टेम्पोला घासला आणि टेम्पो रस्त्यावर पडला.

यात भाऊसाहेब आणि हेमंत हे दोघे जखमी झाले. टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like