Dighi : भेटायला बोलावून घेत ओळखीच्याच दोघांनी तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – भेटायला म्हणून बोलावून (Dighi) घेत तरुणाला त्याच्याच ओळखीच्या दोघांनी हाताने मारहाण करत लुटले, याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.14) रात्री डुडुळगाव येथे घडला होता.

Talegaon Dabhade : कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी हिताची ॲस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियनचे मोठे पाऊल

याप्रकरणी रविंद्र दिगंबर ढोणे (वय 29 रा. मोशी, आळंदी रोड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी शातांराम वहिले (वय 50) व त्याचा मित्र दिपक अरगडे (वय 40) दोघे रा.डुडुळगाव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने (Dighi) भेटण्यासाठी म्हणून डुडुळगावला बोलावले, तेथे फिर्यादी गेले असता आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. तसेच एकाने फिर्यादीला पकडले व तर दुसऱ्याने खिशातील 3 हजार 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यावरून दिघी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.