Dighi News: दिघी आणि चिखली मधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

एमपीसी न्यूज – दिघी आणि चिखली परिसरातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बुधवारी (दि. 8) दिघी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

दिघी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. सहा सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते सव्वा आठ वाजताच्या सुमारास च-होली येथून फिर्यादी यांची पंधरा वर्षीय भाची बेपत्ता झाली. अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या भाचीला दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा फिर्यादी यांचा संशय आहे.

चिखली पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. 8 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची सतरा वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. अज्ञात इसमाने अज्ञात कारणाचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेल्याचा फिर्यादी महिलेचा संशय आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.