Dighi: भरारी पथकाने पकडले दोन पिस्तूल, पाच काडतुसे

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने एका मोटारीतून दोन पिस्तुलांसह पाच काडतुसे पकडली असून गुरुवारी (दि.२८) पहाटे दिघीतील मॅग्झिन चौकात ही कारवाई कारवाई करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीसाठी शहरात भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विविध पथकांकडून शहरात नाकाबंदी सुरु आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक विभागातील भरारी पथकाचे प्रमुख राजदीप तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र टिके, भाऊसाहेब पाटील, आनंद कापुरे, सुभाष डमाळ, दिलीप खंदारे, पोलीस नाईक दिपाली सुरकुले यांचे पथक दिघी परिसरात वाहनांची तपासणी करीत होते.

  • दरम्यान दिघीतील मॅग्झिन चौकात त्यांनी एक मोटार थांबवली. मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन पिस्तूल आणि पाच काडतुसे मिळाले. हे पिस्तूल जप्त करून वाहनातील पाच जणांना दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.