Dighi : कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वारचा मृत्यू

एमपीसी न्यूज – श्वान (कुत्र्या)ला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगातील दुचाकी दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात 28 नोव्हेंम्बर रोजी दिघी येथे झाला.

प्रवीण सौदागर चिंचोलीकर (30, रा. सहकारनगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार घोगरे यांनी सोमवारी (दि. 30) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मोबाईलवर बोलत दुचाकी चालवत असताना अचानक एक श्वान (कुत्रे) आडवे आले. श्वान (कुत्र्या)ला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रवीणचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी दुभाजकावर आदळली. यामध्ये गंभीर झालेल्या प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.