Dighi : स्थळ नाकारल्याने महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज- स्थळ नाकारल्याचे रागातून दोघांनी महिला व तिच्या पतीला मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. गुरुवारी (दि. 4) दुपारी अडीचच्या सुमारास चऱ्होलीतील चोवीसवाडी परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी एका 41 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जितेंद्र राजेंद्र गिरी आणि श्‍याम सतीश पुरी (दोघेही रा. चऱ्होली, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी जितेंद्र याने फिर्यादीच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र फिर्यादी यांनी ते स्थळ नाकारले. यामुळे आरोपी व फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी फिर्यादी यांचे पती मध्ये पडले असता आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केला. त्यानंतर पीडित महिलेने दिघी पोलिसांत फिर्याद दिली असून उपनिरीक्षक आर.एस.कांबळे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.