Dighi : आईला पाठवलेल्या मेसेजचा जाब विचारणाऱ्या मुलास मारहाण

एमपीसी न्यूज – माझ्या आईच्या मोबाईलवर मेसेज का टाकता, अशी विचारणा करणाऱ्या मुलास घरात घुसून तिघांनी मारहाण केली. तसेच त्याच्या आईचाही विनयभंग केला. ही घटना दिघी येथे घडली.

याप्रकरणी एका महिलेने रविवारी (दि.20) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पंडीत शिंदे, प्रमोद शिंदे आणि विनोद शिंदे (सर्व रा, दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जानेवारी रोजी फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी पंडित शिंदे याला ‘माझ्या आईच्या मोबाइलवर मेसेज का टाकता,’ अशी सर्वांसमक्ष विचारणा केली. या कारणावरून चिडलेल्या आरोपी पंडित याने आपल्या साथीदारांसोबत फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन त्यांच्या मुलास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याला सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या आईचा आरोपीने विनयभंग केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.