Dighi : पतीच्या मित्राकडून विवाहितेचा विनयभंग

Married Women haressment by a husband's friend :आरोपी हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे

एमपीसी न्यूज – पती घरात नसताना पतीच्या मित्राने घरात प्रवेश करत विवाहितेचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 21) वडमुखवाडी, च-होली बुद्रुक येथे घडली.

योगेंद्र नारायण साटम (वय 28, रा. कोपरखेरणे, नवी मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास महिलेचे पती घरी नसताना आरोपी घरात आला.

पतीच्या मित्राला पाहून पीडित महिलेने ‘तू इथे काय करतोस’ अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने महिलेशी गैरकृत्य करत त्यांचा विनयभंग केला.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.