Dapodi : सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारमधून डिजिटल कारटेप चोरीला

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून कारमधून डिजिटल कारटेप चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी आठच्या सुमारास दापोडी येथे उघडकीस आली.

दीपाली सुजित शेट्टी (वय 47, रा दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपाली यांनी त्यांची एम एच 14 / एच डी 6672 ही कार दापोडी येथील माया नगरी हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी कारची पुढील डाव्या बाजूची काच फोडून कारमधून 45 हजार रुपये किमतीचा डिजिटल कारटेप चोरून नेला. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.