First Look : ‘लॉ ऑफ लव्ह’ च्या फर्स्ट लूकचे झाले डिजिटल अनावरण

Digital release of the first look of The Law Of Love on OTT platform.

एमपीसी न्यूज – निर्माता आणि पटकथाकार जे. उदय हे रसिकप्रेक्षकांसाठी नवा मराठी चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ घेऊन येत आहेत. सध्या ऑनलाईन जास्तीत जास्त लोकं अ‍ॅक्टिव्ह असल्याने निर्मात्यांनी याच वेळेला आपली संधी मानत ‘लॉ ऑफ लव्ह’च्या फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण सोशल मीडियावर केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम अर्थात चित्रपटसृष्टीला देखील बसला आहे, वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यातून थांबवण्यात आले, चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे नव्या चित्रपटांचे प्रदर्शन तसेच नव्या चित्रपटांचे प्रोमोशन रखडले आहेत.

आणि याच वेळेचा सदुपयोग करत एका सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माता आणि पटकथाकार जे. उदय  रसिकप्रेक्षकांसाठी नवा मराठी चित्रपट “लॉ ऑफ लव्ह” घेऊन येत आहेत.

सध्या घरातच बसून असलेल्या नागरिकांचा इंटरनेट वापर वाढला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकं डिजिटली ‘अ‍ॅक्टिव्ह’ असल्याने निर्मात्यांनी याच वेळेला आपली संधी मानत ‘लॉ ऑफ लव्ह’ च्या फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण सोशल मीडियावर केलं आहे.

चित्रपटाचं नाव जितकं हटके आहे तितक्याच हटके त्याची कहाणी असेल यात काहीच शंका नाही. चित्रपटाचे निर्माता आणि पटकथाकार जे. उदय यांचा हा पहिला सिनेमा आहे. लॉकडाऊन नंतर सुरु होणाऱ्या प्रेक्षकांच्या बदललेल्या आयुष्यासाठी हा सिनेमा उत्तम पर्याय ठरणार आहे.

या सिनेमात नक्की कोणकोणते कलाकार असणार आहेत, कोणत्या नव्या गोष्टी असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यातचं आहे, त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकचं राहील.

प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न

‘प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, सध्याची परिस्थिती लक्षात घेता खास सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या लोकांसाठी नवं काहीतरी देण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण केलं आहे. लॉकडाऊन च्या काळात उत्सुकता वाढविणे आणि सर्व सुरळीत चालू झाल्यावर प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे’

–  जे. उदय, निर्माता आणि पटकथाकार

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.