Dilip Kumar Passed Away : जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

एमपीसी न्यूज – जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी साडे सात वाजता मुंबईतील हिदुंजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. 

गेल्या आठ दिवसांपासून दिलीप कुमार यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांच्यावर हिदुंजा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारत होती मात्र, आज अखेर सकाळी साडे सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दिग्गज दिलीप कुमार यांची ट्रॅजेडी किंग म्हणून बॉलिवूड मध्ये ओळख होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.