Dilipkumar & Shahrukh Khan Relation: जेव्हा शाहरुखची आई त्याला म्हणते, ‘तू अगदी दिलीपसाब सारखा दिसतोस’…

Dilipkumar & Shahrukh Khan Relation - When Shahrukh's mother says to him, 'You look just like Dilip Saab' आजही दिलीपकुमार आणि सायराबानू शाहरुखला आपल्या मुलासारखेच मानतात. तसेच शाहरुखही त्यांच्या भेटीसाठी वारंवार जात असतो.

एमपीसी न्यूज- शाहरुखखान आणि दिलीपकुमार यांच्यामधील जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. दिलीपकुमार हे अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. मनोजकुमार, धर्मेंद्र यांसारख्या आधीच्या पिढीतील अभिनेत्यांनी ही गोष्ट वेळोवेळी उघडपणे सांगितली आहे. मात्र दिलीपकुमार आणि शाहरुखखान यांच्यामध्ये एक वेगळाच बंध आहे. शाहरुखचे वडील आणि दिलीपकुमार हे एकमेकांचे घट्ट मित्र होते. एवढेच नव्हे तर दोघेही दिल्लीत एकमेकांचे शेजारी होते.

त्यामुळे बालवयात शाहरुख त्यांच्या घरी नेहमी जात येत असे. तसेच शाहरुखची लंडन येथील नातलग आत्या सायराबानू यांच्यासाठी तिकडून औषधे पाठवत असे.

असे म्हटले जाते की, एकदा शाहरुखची दिवंगत आई त्याचे दिलीपकुमार यांच्यासोबतचे लहानपणाचे फोटो बघत होती. तेव्हा ती पटकन म्हणाली की ‘शाहरुख अगदी दिलीपसाब सारखा दिसतो’.

आजही दिलीपकुमार आणि सायराबानू शाहरुखला आपल्या मुलासारखेच मानतात. तसेच शाहरुखही त्यांच्या भेटीसाठी वारंवार जात असतो.

या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. या दोघांचाही फिल्मी दुनियेशी काहीही संबंध नव्हता. दोघांनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like