एमपीसी न्यूज – इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्तिक वारी निमित्त दिंडी सोहळा पार पडला. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा केली. दिंडी सोहळ्यामध्ये हरिनामाच्या गजरात सर्व विद्यार्थी तल्लीन झाले. कोरोनाच्या संकटानंतर प्रथमच या दिंडीचे आयोजन होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE ) इंदोरी सोमवार (दि 21) रोजी चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्तिक वारी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना संकटानंतर या दिंडीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले.
Alandi : ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात हरिनामाच्या गजरात माऊलींचा रथोत्सव संपन्न
संत ज्ञानेश्वर महाराजांचा 726 वा संजीवन समाधी सोहळा औचित्य साधून विद्यालयांमध्ये या वारीचे आयोजन करण्यात आले.आज सर्व विद्यार्थी व अध्यापक वृंद यांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. विठ्ठल-रुक्मिणी, संत जनाबाई, संत नामदेव,भक्त पुंडलिक, संत तुकाराम, पंढरीचा वारकरी यांची प्रतिनिधिक रूपे विद्यार्थ्यांनी साकारली होती.
विद्यालयाच्या प्राचार्या हेमलता खेडकर यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय,संप्रदायाचा उद्देश,प्रसार, कार्य व वारीचे महत्व याबाबत माहिती सांगितली. विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण होते.
हरिनामाच्या गजरात विद्यार्थी तल्लीन झाले होते. वैष्णवांचा गजर, टाळ व मृदुंगाने वातावरण दुमदुमले होते. पालखी घेऊन विद्यार्थी व वेशभूषा केलेल्या वारकऱ्यांनी विद्यालयातून दिंडी काढली.’भेटी लागे जीवा लागलीसे आस!’ ही अनुभूती सर्वांनी अनुभवली. सगळे वातावरण भक्तिमय व विठ्ठलमय झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपले मोलाचे मत व्यक्त केले. शेवटी पांडुरंगाची आरती व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.