Pimpri : महापालिका आषाढीवारीतील दिंडी प्रमुखांचा मृदुंगाची भेट देऊन सत्कार करणार

पालखी सोहळ्याचे उद्या शहरात आगमन होणार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आषाढीवारीत सहभागी होणा-या दिंडी प्रमुखांना यंदा मृदुंग भेट दिला जाणार आहे.  नगरसेवकांच्या मानधनातून मृदुंगाची खरेदी केली आहे. आळंदी, पंढरपूर आणि पाथर्डीतून 743 मृदुंगांची खरेदी केली आहे.

जग्‌दगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी 334 वा पालखी सोहळ्याचे आज (सोमवारी) देहूगावातून प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याचे मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होणार असून आकुर्डी येथे दुसरा मुक्काम असणार आहे. वारक-यांच्या स्वागतासाठी औद्योगिकनगरी सज्ज झाली आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालख्या पिंपरी-चिंचवड शहरातून जातात. महापालिकेतर्फे दरवर्षी दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देऊन गौरव केला जातो.

यंदा दिंडी प्रमुखांना मृदुंग भेट दिला जाणार आहे. महापालिकेने आळंदीतून 150, पाथर्डी 150 आणि पंढरपूर येथून 443 असे 743 मृदूंग खरेदी केले आहेत. या मृदुंगाच्या एका नगाची किंमत तीन हजार तीनशे रुपये आहे. याचा खर्च सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मानधनातून केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.