Pune : दिनकर शास्त्री भुकेले यांना प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार जाहीर

8 नोव्हेंबर रोजी एस एम जोशी सभागृहात पुरस्कार प्रदान समारंभ

एमपीसी न्यूज – रामकृष्णहरी कृषी प्रतिष्ठानचा प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार हभप दिनकर शास्त्री भुकेले यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी (दि. 8) नवी पेठ पुणे येथील एस एम जोशी सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. माजी आमदार हभप उल्हासदादा पवार यांची कृतज्ञता पुरस्कारार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे.

मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. अखिल भारतीय वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, आमदार कपिल पाटील, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, हभप शेखर महाराज कुटे, देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जगद्गुरू संत तुकोबांची पगडी, उपरणे, गाथा, तुळशीचे रोप, मानपत्र व रोख 25 हजार रुपये असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. हरीश चिकणे, अभिनंदन थोरात, मीरा चिकणे-देशमुख, नारायण मुरकुटे, नाथाभाऊ कुदळे, मंदार चिकणे, रामकृष्णहरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, राजीव जगताप, सुनील महाजन, उद्धव भडसाळकर आदींनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.