Pune : दीपाली धुमाळ यांनी स्वीकारला विरोधी पक्षनेते पदाचा पदभार

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडीच्या नगरसेविका दीपाली प्रदीप धुमाळ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सोमवारी दुपारी पदभार स्वीकारला.

यावेळी माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, नगरसेविका अश्विनी भागवत, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक अशोक कांबळे, भैय्यासाहेब जाधव, वनराज आंदेकर उपस्थित होते.

दीपाली धुमाळ म्हणाल्या, सर्वसामान्य महिलेला विरोधी पक्षनेते पदाची संधी राष्ट्रवादीने दिली. त्याबद्दल मी आमचे अध्यक्ष शरद पवार यांची आभारी आहे. आगामी काळात पुणे शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. पाणी, कचरा, आरोग्य, अशा सोयीसुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घेऊ. महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी उभारण्यासाठी पाठपुरावा करू. पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी आंदोलन करू. विरोधाला विरोध करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.