Nigdi : भाजप प्राधिकरण चिंचवड स्टेशन मंडल महिला सरचिटणीस पदी दीपाली काकडे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी प्राधिकरण चिंचवड स्टेशन मंडल महिला सरचिटणीस पदावर दीपाली विनायक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

महाराष्ट्र राज्याच्या लोकलेखा समिती महामंडळाचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या उपस्थितीत दीपाली काकडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्राधिकरण चिंचवड स्टेशन मंडल अध्यक्ष अण्णा गर्जे, सामाजिक कार्यकर्ते सलिम शिकलगार, माणिक फडतरे, हेमंत देवकुळे, प्रसाद शिंदे, सुधीर साबळे, अमर मतकर, अभिजित ढेरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्राधिकरण चिंचवड स्टेशन मंडल अध्यक्ष अण्णा गर्जे यांनी काकडे यांना नियुक्तीचे पत्र दिले. भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येय, धोरणे तसेच राज्य व केंद्र सरकारने केलेली कामे समाजातील सर्व स्तरावर पोहोचवावी, असे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.