Diploma Addmission : थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

यासंबंधीचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी गुरुवारी प्रसिद्ध केले.

एमपीसी न्यूज – तंत्रशिक्षण विभागाच्या थेट द्वितीय वर्ष पदविका (डिप्लोमा) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आता 7 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष डिप्लोमासाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवारी संपली होती. यासंबंधीचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी गुरुवारी प्रसिद्ध केले.

त्यात विद्यार्थ्यांना थेट द्वितीय डिप्लोमा प्रवेशासाठी ऑनलाइनद्वारे अर्ज करण्यास दि.7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

या मुदतीत विद्यार्थ्यांना अर्ज निश्चिती, कागदपत्राची पडताळणी होणार आहे. त्यानंतर दि. 10 सप्टेंबर रोजी या प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

या यादीवरील आक्षेप अथवा हरकतीसाठी विद्यार्थ्यांना 11 ते 13 सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. त्यानंतर दि. 15 सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचे डॉ. अभय वाघ यांनी परिपत्रकात नमूद केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.