Rural Technology Diploma Course : विज्ञानाश्रमात ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम

डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रमाची घोषणा

एमपीसी न्यूज – विज्ञानाश्रम (पाबळ जि.पुणे) तर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग च्या मान्यतेने डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी (Rural Technology Diploma Course) या पदविका अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. विज्ञानाश्रमचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम असून त्यात वर्कशॉप, इलेक्ट्रिकल, फूड प्रोसेसिंग,डेअरी,पोल्ट्री, सौर तंत्रज्ञान, आधुनिक शेती,संगणक आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग यामधील आधुनिक संधी यावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे.

उद्योग उभारणीसाठी मदत केली जाणार आहे. दहावी ,बारावी उत्तीर्ण /अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9730005025 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.या www.vigyanashram.com या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळवता येईल.

Domestic Violence : विवाहितेचा छळ करून आत्महत्येस केले प्रवृत्त; पती आणि सासूला अटक

ग्रामीण भागात शेती आणि कृषी आधारित उद्योगांच्या उभारणीसाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असून हाताने काम करण्याच्या सूत्रावर हा अभ्यासक्रम आधारित आहे. या पदविका (Rural Technology Diploma Course) प्रमाणपत्रानंतर विद्यार्थ्याना बँकेकडून व्यवसाय उभारणी साठी कर्ज मिळवण्यासाठी विज्ञान आश्रमाकडून मदत केली जाते.

विज्ञानाश्रमाचे संस्थापक ज्येष्ठ शास्त्रज्ञ दिवंगत डॉ श्रीनाथ कलबाग यांनी हा अभ्यासक्रम सुरु केला असून त्यात कालानुरूप अनेक बदल करण्यात आले आहेत. शेतीआधारित ग्रामीण विकासाला गती देणारा हा अभ्यासक्रम आहे, असे डॉ योगेश कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.