Diploma Admission : डिप्लोमा थेट द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया 11 डिसेंबरपासून 

एमपीसी न्यूज – डिप्लोमाच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया 11 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. थेट द्वितीय वर्ष पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या (पदविका)थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो.

तंत्रशिक्षण विभागाने डिप्लोमाच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाचे दोन फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पहिली फेरी 11 डिसेंबर, तर दुसरी फेरी 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची संस्थांना 7 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

जागा जाहीर करणे – 11 डिसेंबर

विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम भरणे व निश्‍चित करणे – 12 ते 14 डिसेंबर

पहिल्या फेरीच्या तात्पुरत्या जागा वाटप – 16 डिसेंबर

केपद्वारे वाटप जागेचा स्वीकार करणे – 17 व 18 डिसेंबर

कागदपत्र सादर करून प्रवेशनिश्‍चिती करणे – 17 ते 19 डिसेंबर

दुसरी प्रवेश फेरीसाठी जागा जाहीर करणे – 20 डिसेंबर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.