Vedanta-Foxconn Company : वेदांता- फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातच रहावी यासाठी थेट राष्ट्रपतींकडे मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यामध्ये उद्योगांसाठी (Vedanta-Foxconn Company) पूरक असे नैसर्गिक स्तोत उपलब्ध आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्य हे देशांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर आहे. स्त्रोत व सुविधा उपलब्ध असताना सुद्धा हा प्रकल्प गुजरातला का हलवला जात आहे? यात महाराष्ट्राचे नुकसान असून वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रातच रहावी, अशी मागणी कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनचे अध्यक्ष सुरज बाबर यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटींची सूट वेदांता फॉक्सकॉन कंपनीला दिली असतानासुद्धा कंपनी गुजरातला हलवली जाते. त्याऐवजी गुजरात सरकार 29 हजार कोटी रुपये देत आहे. तुलनात्मक दृष्ट्या आपण जर पाहिले तर महाराष्ट्र सूट जास्त देत असूनही प्रकल्प गुजरातला हलवला जातो. एक प्रकारे महाराष्ट्र व येथील नागरिकांवर अन्याय होत आहे. केंद्र सरकार दबाव टाकत आहे, की काय? याची पण चौकशी होणे गरजेचे आहे.

KPMG : ‘केपीएमजी’वर प्रशासन मेहरबान; पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ

ही कंपनी गुजरातमध्ये गेली, तर (Vedanta-Foxconn Company) अतिशय मोठा फटका व अन्याय महाराष्ट्रावर होणार आहे. यामुळे 1,00,000 रोजगार निर्मितीपासून महाराष्ट्र मुकणार आहे. वंचित राहणार आहे, तसेच 21 बिलियन डॉलर म्हणजेच 1 लाख 58 हजार कोटी रुपये गुंतवणूक महाराष्ट्रमध्ये होणार होती. 5 ते 8 बिलियन डॉलर इतकी अतिरिक्त गुंतवणूक या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रामध्ये झाली असती. तसेच, करापोटी महाराष्ट्र राज्याला 26 हजार 200 कोटी रुपये मिळाले असते, परंतु एक प्रकारे सर्व उपलब्धता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असतानासुद्धा हा प्रकल्प ही कंपनी गुजरातला हलवल्याने एक प्रकारचा अन्याय महाराष्ट्र राज्यावर होत आहे. म्हणून आपण वास्तविकता पाहता हा प्रकल्प महाराष्ट्रातच व्हावा व येथील कष्टकरी कामगार वर्गाला, महाराष्ट्र राज्यातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.