Maval: लोहगड विसापूर विकास मंचतर्फे प्रजासत्ताक दिनी विसापूर किल्ल्याच्या वाटेवर दिशादर्शक फलक

एमपीसी न्यूज – शिवाजी रायगड स्मारक समिती संचलित लोहगड विसापूर विकास मंचतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर विसापूर किल्ल्याच्या वाटेवर दिशादर्शक बोर्ड बसवले. हे बोर्ड बसवताना बऱ्याच ठिकाणी दगडावर ड्रिलिंग करून हे बोर्ड बसवले. तसेच बऱ्याच ठिकाणी दगडावरती पेंटिंग करून दिशादर्शक बाण दाखवले. पाटणमार्गे विसापूरवर जाताना हे बोर्ड बसवले.

बहुसंख्य पर्यटक संध्याकाळी किल्ला उतरत असताना वाट चुकतात त्यांना दिशा मिळावी. या हेतूने मंचतर्फे हा उपक्रम करण्यात आला.  हा उपक्रम करून यायला कार्यकर्त्यांना रात्रीचे 9 वाजले परंतू प्रजासत्ताक दिन सत्कारणी लावल्याचे समाधान कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर होते. या उपक्रमात विश्वास दौंडकर, सागर कुंभार, सचिन निंबाळकर, चेतन जोशी, अनिकेत आंबेकर, अमोल मोरे, बाळासाहेब मोहिते , चेतन नाटक, संदीप भालेकर, गौरव गरवड, रुपेश लोखंडे यांनी आजची मोहीम राबवली.

विसापूर किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे. गडावर जाताना छोट्या-छोट्या पाऊल वाटा खूप आहेत. त्यामुळे पर्यटक त्याच्यामध्ये फसतो. महिन्यामध्ये एखादा पर्यटक तरी गडावर अडकतो. त्यामुळे प्रशासनाने गडावर जाण्यासाठी एखादा मोठा कच्चा रस्ता तयार करावा, अशी मागणी मंचातर्फे करण्यात येत आहे. आता पुढील उपक्रम लोहगड किल्ल्यावरील महाशिवरात्र यात्रा आहे, असे संस्थापक सचिन टेकवडे व अध्यक्ष संदीप गाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.