Pune : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकाला एटीएसकडून अटक

हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय

एमपीसी न्यूज : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली असून हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय व्यक्त होत आहे.

डीआरडीओ चे संचालक प्रदीप कुरूलकर यांना एटीएस कडून अटक करण्यात आली असून हनीट्रॅप मध्ये अडकून संवेदनशील माहिती पाक इंटेलिजन्स ॲाफिसरला दिल्याच स्पष्ट झालं आहे. त्यांच्या निवृत्तीला सहा महिने राहिले असताना हनीट्रॅपच्या जाळ्यात ते अडकले आहेत..गेल्या सहा महिन्यांपासून ते मोबाईल च्या माध्यमातून पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेशी संपर्कात होते.

संरक्षण संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ यांनी पुणे येथील (Pune) त्यांचे कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह (PIO) चे हस्तक यांच्याशी सोशल मिडिया च्या माध्यमातून व्हॉट अपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्काति राहिले असल्याची माहिती डि. आर. डी. ओ. चे शास्त्रज्ञ यांनी पदाचा गैरवापर करत त्यांचे ताब्यात असलेले संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

Trailer launch : “चौक” चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

डीआरडीओ ही संस्था देशाच्या लष्करासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांची निर्मिती करते. या संस्थेच्या पुण्यातील संचालकांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.(Pune) या संचालकाने व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करुन एटीएसने त्यांना अटक केली आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.