Pune : दिग्दर्शक प्रवीण तरडे धक्काबुक्की प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही

एमपीसी न्यूज –  ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे  यांच्या ऑफिसमध्ये घुसून धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना काल रविवारी (दि.18) दुपारी अडीच च्या दरम्यान कोथरूड येथील पौड रोडवरील डिरेक्टर प्रविण तरडे यांच्या ऑफिसमध्ये घडली होती. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे पौड रोड येथे कार्यालय आहे. येत्या शुक्रवारी (दि.23) त्यांचा बहुचर्चित मराठी सिनेमा मुळशी पॅटर्न हा प्रेक्षकांच्या भेटीला सिनेमागृहात येणार आहे. परंतु हा सिनेमा प्रदर्शित होण्याआगोदरच वादामध्ये सापडला आहे. या सिनेमातील काही वाक्ये आणि दृश्ये ही काही वादग्रस्त असल्यामुळे त्यांच्याच तालुक्यातील आठ ते दहा तरूणांनी प्रविण तरडे यांच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांना धक्काबुक्की करत ऑफिसची तोडफोड
देखील केली. गैरसमजातून हा सर्व प्रकार घडल्याचे प्रवीण तरडे यांनी लोकांशी संवाद साधताना सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन जाहीर केले आहे.

त्याचबरोबर सर्वांचे गैरसमज चित्रपट पाहिल्यानंतर दूर होतील असे सांगून त्यांनी या वादावर पडदा टाकला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.