BNR-HDR-TOP-Mobile

Pune : जनसंवादाशिवाय थोपवल्या जाणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय

'असोसिएशन ऑफ नगर रोड सिटीझन्स फोरम’ची टीका

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज : शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम नागरिकांच्या समस्या, त्यांच्या अडचणी लक्षात न घेता घाईघाईने केले जात असून, कोणत्याही जनसंवादाशिवाय थोपवल्या जाणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय होणार असल्याची टीका ‘असोसिएशन ऑफ नगर रोड सिटीझन्स फोरम’ने केली आहे. मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना नेमका कोणता त्रास होणार आहे; तसेच यापूर्वी सार्वजनिक निधीतून उभारलेल्या पायाभूत सुविधांचे नुकसान मेट्रोतर्फे केले जाणार नाही, याची खात्री महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) द्यावी आणि २० सप्टेंबरपूर्वी नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी फोरमने केली आहे.

फोरमच्या निमंत्रक कनीझ सुखराणी यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासह महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम् यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. नगर रस्त्यावरील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य मार्ग निघेपर्यंत या मार्गावरील काम तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

HB_POST_END_FTR-A4

.