Hinjawadi : कंपनीच्या मिटिंगमध्ये महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – कंपनीची मीटिंग सुरू असताना युनिट हेड या पदावरील व्यक्तीने महिलेचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 19) कॉनकर्ड मोटर्स सूस येथे घडली.

याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार युनिट हेड विक्रम गुळवणी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला मागील काही दिवसांपूर्वी लग्नानिमित्त सुट्टीवर होती. सुट्टी संपवून महिला परत कामावर आली. सोमवारी सकाळी कंपनीची मिटिंग होती. कंपनीची मीटिंग सुरू असताना आरोपीने महिलेसोबत अश्लील वर्तन केले. तसेच महिलेशी अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.