Pune : ती माफी नाही, खोट्या प्रकणात मला अडकवू नका म्हणून विनंती ; आमदार टिळेकरांचा खुलासा (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज – हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी आमदार टिळेकर यांनी फिर्यादीचे हात जोडून पाय धरल्याचा सीसीटीव्ही व्हायरल होत आहे. फिर्यादी असलेल्या रवींद्र बराटे यांनी त्यांच्या विरोधात चौकशी सुरू केल्याने व्हिडिओ व्हायरल केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मी रवींद्र बराटे यांची माफी मागितली नाही, खोट्या प्रकरणात मला अडकवू नका, अशी विनंती केल्याचा खुलासा टिळेकरांनी केला.

खंडणी मागितल्याप्रकरणी टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना अशाप्रकारे भाजप आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.