Pimpri : पाण्याच्या नियोजनाबाबत पाणीपुरवठा अधिकारी व युवासेना यांच्यात चर्चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची निर्माण झालेली गंभीर समस्येबाबत व येणा-या  काळात पाण्याचे योग्य नियोजनाबाबत पाणी पुरवठा अधिकारी मकरंद निकम यांच्याशी युवा सेनेने चर्चा केली.  

यावेळी युवती सेनाधिकारी पिंपरी विधानसभा प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, उपविभाग संघटक सनी कड, ओंकार जगदाळे, रवि नगरकर, नंदकुमार देवकर आदी उपस्थित होते.

याबाबत मकरंद निकम म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराला मावळ तालुक्‍यातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पवना धरणांत पाण्याचा साठा कमी आहे. त्यामुळे दिवसा आड पाणी सुरु केले आहे. हा पाण्याचा साठा जूनपर्यंत पुरवायचा आहे. या चर्चेमधून  पाणीपुरवठा अधिकारी यांनी नागरिकांना योग्य तो पाण्याचा काटकसर करा, पाणी जपून वापरा,  नागरिकांनी फरशा, वाहने धुण्यासाठी, बगीचा आदीसाठी महापालिका पुरवित असलेल्या पाण्याचा वापर करु नये.

घरातील, इमारतींमधील, नळांमधून, पाईप्समधून होणारी पाणी गळती बंद करावी. टाक्‍यांमधून पाणी ओव्हर फ्लो होऊ नये देऊ नये. महापालिकेच्या पाईपलाईनमधून होत असलेली गळती त्वरित पाणीपुरवठा विभागास कळवावी. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी चर्चेतून केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.