Pune : यापुढे सल्लागार न नेमण्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा

एमपीसी न्यूज – यापुढे कोणत्याही प्रकल्पासाठी सल्लागारच न नेमण्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांची नियुक्ती त्या कामाकरताच असते मग सल्लागारांवर आणखी उधळपट्टी कशासाठी करायची? त्या संदर्भातील धोरण लवकरच तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी आज दिली.

_MPC_DIR_MPU_II

एचसीएमटीआर साठी 2 कोटी रुपये देऊन सल्लागार नेमण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध प्रकारचे टेंडर मंजूर करण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच सभा होती. तर, आपण नगरसेवक आणि आमदार दोन्ही पदावर काम करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. त्या संदर्भातील अंतिम निर्णय पक्ष घेणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.