Pune : महापालिकेच्या अंदाजपत्रकावर सोमवारपासून चर्चा

एमपीसी न्यूज – स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी 2020 -21 चा तब्बल 7 हजार 390 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर येत्या सोमवारपासून (दि. 2 मार्च) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी 6 हजार 229 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समिती अध्यक्षांनी त्यामध्ये 1 हजार 161 कोटी रुपये वाढ केली. या बजेटमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना साधारण अडीच ते तीन कोटी रुपये निधी देण्यात आला. तर, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना चांगला निधी देण्यात आला आहे.

प्रत्येकी 5 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. स्थायी समिती सदस्य, विविध राजकीय पक्षाचे गटनेते यांना 10 कोटी तर, नगरसेवक असलेल्या आमदारांना 5 कोटी, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी जवळपास 40 कोटी रुपये निधी नेला आहे.

स्थायी समिती अध्यक्षांनी 7 हजार 390 कोटींचे बजेट सादर केले. हे बजेट फुगविण्यात आल्याचा आरोप आहे. साधारण 2 ते 2 हजार 500 कोटींची तूट येण्याचा अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.