Pune News : चारित्र्यावर संशय घेणार्‍या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले ‘हे’ भयंकर पाऊल

एमपीसी न्यूज : वारंवार चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका 32 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या औंध परिसरातील उच्चभ्रू असलेल्या ट्विन टॉवर सोसायटीत हा प्रकार घडला. चतु:शृंगी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालविका सौरभ भादूरी (वय 32) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती सौरभ शेखर भादुरी (वय 30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत विवाहितेची आई नीना रजनीराम कुलर (वय 59) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी सौरभ हा उच्चशिक्षित आहे. औंध उच्चभ्रू सोसायटी ट्विन टॉवर सोसायटीत तो राहत होता. मार्च 2021 पासून तो सातत्याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून मालविका हिने 9 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी सौरभ भादुरी याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.