Disha becomes Most Desireble Women: दिशा ठरली मोस्ट डिझायरेबल वुमन

Disha patani becomes Most Desirable Woman माझ्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. तुम्ही मला ग्लॅमरस म्हणता पण आजही मी एक टॉमबॉयचं आहे.

एमपीसी न्यूज – नव्या दमाच्या अभिनेत्रींमध्ये आपले लुक आणि अभिनय यामुळे दिशा पटानीने फार थोड्या अवधीतच फॅन्सच्या मनात स्थान पटकावले आहे. तिचे एम. एस. धोनी, मलंग, बागी -2 यासारख्या चित्रपटांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. एका चॉकलेटच्या जाहिरातीने आपल्या करियरची सुरुवात करणारी दिशा सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. दिशाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आलिया भट्ट, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण यांसारख्या नामांकित अभिनेत्रींना मागे टाकत दिशा 2019 मधील ‘मोस्ट डिझायरेबल वुमन’ ठरली आहे.

दिशाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. ‘चाहत्यांनी माझ्या प्रती जे प्रेम व्यक्त केलं त्यासाठी मी आभारी आहे. माझ्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. तुम्ही मला ग्लॅमरस म्हणता पण आजही मी एक टॉमबॉयचं आहे’ असं म्हणत दिशाने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. दिशाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी दिशावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘इ टाइम्स’ने भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींचं एक ऑनलाइन सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात सुमन राव, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, वर्तिका सिंह, कियारा आडवाणी, श्रद्धा कपूर, यामी गौतम, अदिती राव हैदरी, जॅकलिन फर्नांडिस, शिवानी जाधव, आलिया भट्ट, तारा सुतारिया, गायत्री भारद्वाज अशा तब्बल 200 पेक्षा अधिक अभिनेत्री होत्या.

या सर्वेक्षणात चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे आपल्या आवडत्या अभिनेत्रीला वोट करायचे होते. यामध्ये सर्वाधिक मतं अभिनेत्री दिशा पटानीला मिळाली. त्यामुळे 2019 मधील ती ‘मोस्ट डिझायरेबल वुमन’ ठरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.