औषध फवारणी फक्त महापालिकेनेच करावी : मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये केल्या जाणा-या जंतूनाशक फवारणीमुळे ‘अपाय’ होऊ शकतो. त्यामुळे अशी फवारणी करु नये, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, फवारणी करायची असल्यास महापालिका प्रत्यक्ष त्या भागाची तपासणी करुन आवश्यकता भासल्यास स्वत: फवारणी करेल असाही सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खासगी संस्था, नगरसेवकांकडून कोणतीही परवानगी न घेता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जंतूनाशक औषध फवारणी केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.30) मुंबईत कोरोनासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाची बैठक झाली.

जंतूनाशकाच्या केल्या जाणा-या फवारणीमुळे अपाय होऊ शकतो. त्यामुळे अशी फवारणी करु नये आणि करायची असल्यास संबंधित महापालिका प्रत्यक्ष त्या भागाची तपासणी करुन आवश्यकता भासल्यास स्वत: फवारणी करेल निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरसेवक, काही संघटना, संस्था, युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत केल्या जाणा-या औषध फवारणीत सोडियम हायपोक्लोराईट, बॅक्टोडेक्स पाण्यात मिसळण्याचे प्रमाण योग्य आहे का?, फवारण्यासाठी वापरण्यात येणा-या पाण्याचा दर्जा, औषध बनावट तर नाहीत ना? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे या खासगी संघटना, संस्थामार्फत केल्या जाणा-या फवारणीला प्रतिबंध घालण्याची मागणी करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.