Alandi : भरदिवसा रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – लहान भावासोबत दुचाकीवरून जात असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. तसेच घरी सांगितले तर पाहून घेण्याची धमकी दिली. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 22) दुपारी सव्वाचार वाजता मरकळ-गोलेगाव रोडवर काळूबाई मंदिराजवळ घडला.

सचिन बाळासाहेब पाचपुते (वय 24, रा. मरकळ गावठाण, ता. खेड), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 17 वर्षीय मुलगी तिच्या 14 वर्षीय भावासोबत मरकळ-गोलेगाव रोडने दुचाकीवरून जात होती. रस्त्यात काळूबाई मंदिराजवळ आरोपी बुलेटवरून आला. त्याने पीडित मुलीला थांबण्यास सांगितले. त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबवली असता सचिन याने मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच ‘तुम्ही घरी काही सांगितले, तर पाहून घेईन’ अशी धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.