Chinchwad : कारचा पाठलाग करून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – मोटारीतील महिलेचा पाठलाग करून तसेच तिच्या मोबाईलवर अश्‍लील मेसेज पाठवून विनयभंग करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवडमध्ये सोमवारी (दि. 26) सकाळी घडली.

संजीव पाटील (रा. कुमार पद्‌मालय, नागरस रोड, औंध, पुणे), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 40 वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला या चिंचवडगावातील अहिंसा चौकातील सिग्नलला आपल्या मोटारीत होत्या. त्यावेळी त्यांचा पाठलाग करीत आलेल्या आरोपीने त्यांच्या मोटारीच्या काचेवर टकटक केले. फिर्यादी यांनी काच उघडली असता त्यांच्याकडे अश्‍लील नजरेने पाहिले. तसेच पीडित महिलेच्या मोबाईलवर अश्‍लील मेसेज पाठवून विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.