Pimpri : शिवीगाळ करू नका असे सांगणार्‍या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – शिवीगाळ करू नका, असे सांगणार्‍या एका महिलेचा हात पकडून विनयभंग करत धमकी दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता मोरवाडी येथे घडली.

याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वजित रमेश जोशी (वय-39, रा. मोरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शुक्रवारी मोरवाडी येथून पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी जोशी हा काही लोकांना शिवीगाळ करत होता. शिवीगाळ करू नका, असे फिर्यादी आरोपीला म्हणाल्या. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना तू येथे यायचे नाही, अशी धमकी देत त्यांचा डावा हात पकडून विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.