Lonavala News : लोणावळा शहरात ओबीसीच्या चार जागा कमी झाल्याने नाराजी

एमपीसी न्यूज –  लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी OBC आरक्षणाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. यामध्ये लोणावळा नगरपरिषदेचा प्रभाग क्र. 1 (इंदिरानगर), प्रभाग क्र. 2 (तुंगार्ली) व प्रभाग क्र. 3 (भुशी रामनगर) हे तीन प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. यापैकी प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र. 2 मधील जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरिता राखीव झाल्या आहेत. तर प्रभाग क्र. 13 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी थेट राखीव झाली आहे.

ओबीसी प्रभागांची आरक्षण सोडत आज सकाळी जाहीर झाली. यामध्ये शहरातील 27 सदस्य संख्येपैकी 4 जागा अनुसूचित जाती व 1 जागा अनुसूचित जमातीसाठी, 3 जागा ओबीसीसाठी, 9 जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी व 10 जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत. निवडणूक नियंत्रक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी ही आरक्षण सोडत जाहीर केली.

लोणावळा नगरपरिषद आरक्षण सोडत व प्रभाग

प्रभाग क्र. 1 – (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व (ब) सर्वसाधारण.

प्रभाग क्र. 2 – (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व (ब) सर्वसाधारण.

 प्रभाग क्र. 3 – (अ) अनुसूचित जाती महिला व (ब) सर्वसाधारण.

 प्रभाग क्र. 4 – (अ) अनुसूचित जाती व (ब) सर्वसाधारण महिला.

प्रभाग क्र. 5 – (अ) सर्वसाधारण महिला व (ब) सर्वसाधारण.

प्रभाग क्र. 6 – (अ) सर्वसाधारण महिला व (ब) सर्वसाधारण.

प्रभाग क्र. 7 – (अ) सर्वसाधारण महिला व (ब) सर्वसाधारण.

 प्रभाग क्र. 8 – (अ) अनुसूचित जाती महिला व (ब) सर्वसाधारण.

 प्रभाग क्र. 9 – (अ) अनुसूचित जाती व (ब) सर्वसाधारण महिला.

 प्रभाग क्र. 10 – (अ) सर्वसाधारण महिला व (ब) सर्वसाधारण.

प्रभाग क्र. 11 – (अ) अनुसूचित जमाती महिला व (ब) सर्वसाधारण.

प्रभाग क्र. 12 – (अ) सर्वसाधारण महिला व (ब) सर्वसाधारण.

 प्रभाग क्र. 13 – (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला व (क) सर्वसाधारण महिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.