Pimpri : वादग्रस्त सहाय्यक आयुक्त अष्टीकरांना झटका; पदभार केला कमी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वादग्रस्त अधिकारी अशी ओळख असलेले सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांना विरोधकांच्या मागणीनंतर आयुक्तांनी ‘जोर का झटका’ दिला आहे. त्यांच्याकडील प्रशासन विभागाचा पदभार काढून घेतला असून सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे प्रशासनाची धुरा दिली. तर, चितळे यांच्याकडील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी कमी करत सुरक्षा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आशादेवी दुरगुडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आज (शुक्रवारी)जारी केला. 

सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर हे गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नगरसेवकांच्या अनेक तक्रारी होत्या. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी देखील त्यांच्याकडील पदभार कमी करण्याची मागणी केली होती. महासभेत देखील त्यावर आवाज जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शुक्रवारी)अष्टीकर यांच्याकडील प्रशासन विभाग काढून घेतला आहे. त्यांच्याकडे आता मध्यवर्ती भांडार व निवडणूक विभागाचा पदभार असणार आहे. याशिवाय अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी पदभार देखील आहे.

भूमी आणि जिंदगी, क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे प्रशासन विभाग दिला आहे. त्यांच्याकडील ‘अ’ प्रभागाचा पदभार सुरक्षा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आशादेवी दुरगुडे यांच्याकडे दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.