Wakad Crime News : गृहनिर्माण सोसायटीमध्ये दुुचाकी लावण्यावरून वाद; गुन्हा नोंद केल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी

एमपीसी न्यूज – गृहनिर्माण सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीस तिघांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच महिलेस उद्देशून अश्लिल भाषेचा वापर केला. हि घटना वाकडमधील वेणूनगर येथे शुक्रवार (दि. 20) रोजी रात्री 11 च्या सुमारास घडली.

याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसारी राजेश अर्जुन गोठे (वय 42 रा. वेणुनगर वाकड), स्वाती राजेश गोठे (वय 35 रा. सदर), राजेश गोठे यांचा भाऊ (वय 40 रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती सोसायटीत दुचाकी पार्क करण्यासाठी गेले असता आरोपी गेट समोर आडवी करून थांबलेले होते. फिर्यादीच्या पतीने दुचाकी बाजुला घेण्यास सांगीतले, मात्र आरोपीने फिर्यादी महिला तिचे पती व सासू यांस शिवीगाळ आणि मारहाण केली. फिर्यादीस अश्लिल भाषेत उद्देशून शिवीगाळ केली.

फिर्यादी, त्यांचे पती पोलीस तक्रार दाखल करण्यास गेले असता फिर्यादीच्या सासूला तुम्ही घरात एकट्या असता आणि तुम्हाला घरात घुसून मारू, घराच्या मालमत्तेचे नुकसान करू, तुमच्या मुलाला बाहेर अडवून मारू, आमच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला तर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात दुखापत तसेच 509,323,504, 506 व 34 कलमा अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.