Dighi : पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग; एकास अटक

एमपीसी न्यूज – पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग करून तसेच त्यानंतर तिचा वारंवार पाठलाग करून त्रास देणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दिघी येथे घडली.
नितीन बबन चव्हाण (वय 30, रा. चौधरी पार्क, दिघी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 23 वर्षीय विवाहितेने बुधवारी (दि. 8) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डिसेंबर 2019 ते 8 जानेवारी 2020 या कालावधीत घडली. आरोपी आणि फिर्यादी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी चव्हाण याने फिर्यादी यांना फोन करून बोलविले. फिर्यादी या भेटण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांचा हात पकडून विनयभंग केला. त्यास फिर्यादी यांनी विरोध केला असता आरोपीने पती आणि मुलांना मारण्याची धमकी दिली. तसेच थोबाडित मारत लाथा-बुक्‍क्‍यांनीही मारहाण केली.
यावेळी घाबरलेल्या फिर्यादी यांनी याबाबत तक्रार केली नाही. तसेच नातेवाईकांनाही सांगितले नाही. मात्र त्यानंतर फिर्यादी या मुलाला शाळेत सोडविण्यासाठी तसेच खासगी शिकवणीला सोडविण्यासाठी जात असताना वेळोवेळी दुचाकीवरून पाठलाग करीत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.