Sangvi : सोशल मीडियावरून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर व्हिडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी मोबाईल क्रमांक धारक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली.

याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 9860330419 या मोबाईल क्रमांक धारक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या फोनवर व्हाट्स अपच्या माध्यमातून मंगळवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास 9860330419 या मोबाईल क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. आरोपी व्यक्ती पूर्णपणे नग्न अवस्थेत होत. आरोपीने चेहरा न दाखवता अश्लील चाळे करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.