Pimpri news: शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत, पवना धरणातील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड

0

एमपीसी न्यूज – पवना धरण येथील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्यामुळे नदीमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडले आहे. त्यामुळे रावेत बंधाऱ्याची पातळी कमी झाली आहे.  परिणामी, जलउपसा कमी झाल्याने  संपूर्ण शहरातील  आज बुधवारी आणि उद्या गुरुवारचा सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

_MPC_DIR_MPU_II

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.
पवना धरण येथील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्यामुळे नदीमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडले आहे.  रावेत बंधाऱ्याची पातळी कमी झाली आहे.  त्यामुळे जलउपसा कमी झाल्याने संपूर्ण शहरातील आज आणि उद्या सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील.

याबाबत, जल संपदा विभागाशी समन्वय साधण्यात आला असून  पाणी पुरवठा लवकरात लवकर पुर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment