Pune News: सोशल मीडियामुळे आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय – डॉ.काळकर

एमपीसी न्यूज – जसजसे तांत्रिक व्यत्यय अधिकाधिक सामान्य आणि मोफत मिळत आहे, तसतसे आपल्या जगण्याच्या पद्धतीतही बदल होत आहेत. तंत्रज्ञानामुळे आपले जीवन अनेक प्रकारे विस्कळीत होत आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले आहे.

निगडी येथील आयआयसीएमआरच्या वतीने दिशारंभ-22′ या विद्यार्थी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.यावेळी गोक्केन इंडिया प्रा. लि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्नील गावडे,आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. मनीषा कुलकर्णी,डॉ. सुधीर हसमनीस यांच्यासह संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Rotary club of Pune : जॅकी श्रॉफ व मिनाक्षी शेषाद्री यांच्या हस्ते ‘हॅपी फॅमिली कीट’चे वाटप

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी डॉ. विनोद भेलोसे आणि डॉ. जयश्री मुरली आयानगर यांना 2021-22 वर्षासाठी संस्थेमध्ये प्रगतीमध्ये विशेष योगदानाबद्दल 2020-21 चा “केशव पुष्प पुरस्कार” देऊन सन्मानित केले. वेबक्लिंचर अकादमी आणि आय आय सीएमआर एमबीए आणि मार्सियन टेक्नॉलॉजीज यांच्यात सामंजस्य करार झाला.

पुढे बोलताना डॉ.काळकर म्हणाले की, सरासरी दिवसभरात 6 तास व्हॉटस ॲप तर तीन ते चार तास फेसबुक वापरत आहे. विद्यार्थ्यांनी शंभर टक्के तंत्रज्ञानावर अवलंबून राहू नये.यामुळे दैनंदिन जीवनात आपण आपला वेळ सोशल मीडियावर वाया घालावत आहात हि धोक्याची घंटा आहे,असा इशाराही दिला.

पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन एमबीए द्वितीय वर्षाचे अमय, आयुषी, सबा, शोएब, देबलीना, पलक, प्रिया, सुमित, श्रीकृष्ण, अर्घो, रोहन आणि आंचल यांनी केले. तर आभार दीप्ती बाजपेयी व हर्षल पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.