Pune – आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पासपोर्ट व चारित्रं प्रमाणपत्र मिळण्यास होणार अडचण

एमपीसी न्युज – वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी पुणे वाहतुक विभागाकडून आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांना पासपोर्ट व चारित्रं प्रमाणपत्र मिळविताना अडचण येणार आहे.

शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या छोट्या मोठ्या अपघातांना आळा बसवणे व वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेकडून ई – चलन व सीसीटीव्ही द्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येते. चालकाने दंड ऑनलाईन भरणे अपेक्षित असते परंतु बरेच चालक तो दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा दंड न भरलेल्या केसेसची माहिती पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी विभागाकडे जोडण्यात आली आहे. त्यामुळे आता जो कोणी पासपोर्ट आणि चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल त्याच्या प्रलंबित दंडाची माहिती देखील त्या त्या विभागास प्राप्त होईल.

26 ऑगस्ट पासून गेल्या 4 दिवसात एकूण 92 पासपोर्ट अर्जदारांनी दंड न भरल्याचे समोर आले त्यामुळे त्यांना आता पासपोर्ट मिळणे अडचणीचे ठरणार आहे. यापुढेही अशा वाहनचालकांना खाजगी व शासकीय नोकरीत लायसन्स न देणे याबाबत शिफारस करण्यात येणार आहे. तरी आता वाहतुकीचे नियमभंग करणे हे दंड भरण्यापूरते मर्यादित राहिले नसून पासपोर्ट आणि चरीत्र प्रमाण पत्रासारखी महत्वाच्या गोष्टी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे.

तरी नागरिकांनी आपल्यावर काही ई – चलन प्रलंबित आहे की नाही हे तपासण्यासाठी punetrafficop.net या वेब साईटवर जाऊन आपले थकीत दंड असल्यास तो त्वरित भरावा. त्याबरोबर वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन पुणे वाहतूक शाखेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.