Pune : मध्यवर्ती पेठांमधील पाणीपुरवठा विस्कळीतच

एमपीसी न्यूज – मागील महिना भरापासून पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमधील पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले होते. पण, या भागांतील नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले.

22 दिवसांपासून प्रभाग क्रमांक 17 मध्ये पाणी येत नसल्याने शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे पावसकर म्हणाले होते. पण, अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याचे विशाल धनवडे म्हणाले.

महापालिकेने दि. 6 फेब्रुवारी (गुरुवारी) जलशुद्धीकरण केंद्रांचे काम करण्यात आले होते. त्यासाठी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तेव्हापासून प्रभाग क्रमांक 17 रास्ता पेठ – रविवार पेठ, नाना पेठ, गणेश पेठ, गुरुद्वारा पेठ, कसबा पेठ, भवानी पेठ भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.